आमच्या विषयी
टीम एंटेल्कीच्या सदस्यांना, विविध क्षेत्रांतील त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवामुळे, तसेच अतिशय मजबूत तांत्रिक आणि शैक्षणिक तज्ञांच्या टीमच्या सहकार्य व मार्गदर्शनामुळे सध्याच्या शिक्षण प्रणालीतील आव्हानांची व समस्यांची चांगलीच जाणीव आहे. या जाणीवेमुळे टीम एंटेल्कीला, शहरी, ग्रामीण आणि आदिवासीं विभागांतील विद्यार्थी व युवकांच्या नेमक्या गरजांनुसार, मानवी संसाधन विकासाचा संपूर्ण पट व्यापणार्या उत्पादनांच्या पोर्टफोलिओची रचना आणि तपशील विकसित करण्यात प्रचंड मदत झाली आहे.
विविध साथीदार संस्था, त्यांचे अमूल्य असे शैक्षणिक तसेच अशैक्षणिक बालविकास अनुभव एंटेल्की बरोबर सामायिक करून, त्याद्वारे एन्टेलकीच्या 'जनसामान्यांचे प्रभावी मानवी संसाधनात रूपांतरित करण्याचे' ध्येय पूर्ण करण्यात मदत करतात.
टीम एंटेल्की
मुकुंद भागवत
कार्यकारी संचालक
प्रमोदन मराठे
संचालक
ऋजुता भागवत
संचालक
सल्लागार मंडळ
डॉ. अरविंद नातू
संपूर्ण समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे ध्येय बाळगणारे, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, एनसीएल येथे ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. नातू एक वैज्ञानिक असून सध्या भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, आयसर, पुणे येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या आंतरराष्ट्रीय संशोधन अनुभवामध्ये, बीलेफेल्ड पश्चिम जर्मनी येथील ऑर्गेनिक केमिस्ट्री संस्था, अप्सला, स्वीडन येथील बायोमेडिकल सायन्स / फार्मासिया संस्था, मॉस्को येथील शेमियाकिन इन्स्टिट्यूट ऑफ बायोर्गेनिक केमिस्ट्री संस्था, आणि पोलंडमधील मॉलेक्यूलर बायोलॉजी संस्था यांचा समावेश आहे. अनेक जागतिक स्तरावरील विद्यापीठांमध्ये भेट देणारे एक वैज्ञानिक आहेत आणि त्यांनी बुडापेस्ट आणि केंब्रिजमधील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये भारतीय रसायनशास्त्र संघांचे मार्गदर्शन केले आहे. लब्धी आरडीई जीवनगौरव पुरस्कार, जर्मन अॅकॅडमिक एक्सचेंज सर्व्हिसचे रिसर्च अॅम्बेसेडर यांसारखे अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार व प्रशंसापत्रे त्यांनी त्यांनी प्राप्त केली आहेत.
प्रा. सुभाषचंद्र भोसले
प्रा. भोसले यांनी परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून कांही काळ काम केल्यावर पुणे विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून १९ वर्षे काम पाहिले. या काळात त्यांनी या विद्यापीठाला भारतातील पहिल्या पाच विद्यापीठांमध्ये आणण्यात मोलाचे योगदान दिले. प्रा. भोसले यांनी रयत शिक्षण संस्था, सातारा या संस्थेचे सचिव म्हणून तीन वर्षे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांचे संचालक म्हणून दोन वर्षे, आणि प्रोव्हॉस्ट आणि संचालक (शैक्षणिक) म्हणून डी. वाय. पाटील प्रतिष्ठान पुणे येथे सहा वर्षे, अशा विविध पदांवर काम केले आहे. त्यांनी, ५५ महाविद्यालये आणि संस्थांच्या, शैक्षणिक विकास, शैक्षणिक नैपुण्य आणि संशोधन कार्यात लक्ष घातले आहे. एक ज्येष्ठ प्रशासक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांनी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ तयार केला जो सध्या प्रचलित आहे. महाराष्ट्र व गोव्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठातील शिक्षकांसाठी राज्य पात्रता परीक्षा (एसईटी) आयोजित करण्याचे कामही त्यांच्यावर सोपविण्यात आले होते.
डॉ. अनल्पा परांजपे
डॉ. अनल्पा ह्या बाल मानसशास्त्र मध्ये डॉक्टरेट असून, त्यांचा त्यातील अनुभव २५ वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यांचा, बाल विकास आणि भारतीय बाल बुद्धी परीक्षेचे निदानसूचक उपयोग या विषयांमध्ये हातखंडा आहे. या अगोदरच्या त्यांच्या अगस्त्या आंतरराष्ट्रीय फाऊंडेशनच्या कार्यात त्यांनी शालेय मुलांमधील कुतूहल, निर्मितिक्षमता, व समस्या सोडवण्याच्या मोजमापनाची चाचणी परीक्षा विकसित करण्याचे काम केले. युट्रेक्ट विद्यापीठ नेदरलँड्स प्रमाणित, भारतीय बाल बुद्धी परीक्षेच्या प्रशासक परीक्षकांच्या एक अधिकृत प्रशिक्षक असलेल्या अनल्पा सध्या सृजन मतीमंद -शैक्षणिक सल्लागार केंद्राच्या संचालक म्हणून कार्यरत आहेत. ही संस्था, पौगंडावस्थेतील मुले, पालक, शिक्षक, मानसशास्त्रज्ञ आणि इतर व्यावसायिकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते. त्या, भारती हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र पुणे, यांच्या बालरोग विभागात बाल मानसशास्त्रज्ञ सल्लागार आहेत आणि एक मानसशास्त्रज्ञ म्हणून खाजगी व्यवसायिकही आहेत. तसेच, १९९४ पासून आजपर्यंत मूल्यांकन, निदान आणि शिकण्यातील अपंगत्वासाठी उपचार पुरवणारे शिक्षण, सर्जनशीलता, गतीमान वाचन, अभ्यासाच्या सवयी आणि भाषा विकास, तसेच पालक समुपदेशन यांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.