एंटेल्कीच का?
आमची उत्पादने उपलब्ध करून देत आहेत:
- ‘सामर्थ्य- कमकुवतपणाचे’ सखोल विश्लेषण
- कौशल्ये आणि क्षमता वाढविण्याऱ्या, जगातील सर्वोत्तम प्रणालीच्या माध्यमातून विकास
- बहु-स्तरीय कार्यक्षमता देखरेख आणि मोजमाप यंत्रणा
सामर्थ्य- कमकुवतपणाचे विश्लेषण
- सर्वाधिक संख्येची कौशल्ये आणि क्षमता यांचे वैज्ञानिक विश्लेषण
- 'सामर्थ्य- कमकुवतपणा' विश्लेषणावर आधारित करिअर मार्गदर्शन
- कमकुवतपणावर मात करण्यासाठी शिफारस केलेली कृती योजना
कौशल्ये आणि क्षमता यांचा विकास
- जगातील सर्वोत्कृष्ठ १० शिक्षण पद्धतींमधील महत्त्वाच्या घटकांचा समावेश केलेली प्रणाली
- २१ व्या शतकातील कौशल्ये आणि क्षमतांचा विकास
- आदिवासी, ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांसाठी विशिष्ट रचना केलेली प्रणाली
कार्यक्षमता देखरेख आणि मोजमाप
- कधीही आणि कोठेही कार्यक्षमता देखरेख आणि नियंत्रण करणारी ऑनलाइन यंत्रणा
- आधारभूत कामगिरीमधील सुधारणा दर्शविणारी सुविधा उपलब्ध
- सुधारात्मक आणि प्रतिबंधात्मक कृती योजनेसंदर्भात वेळेवर सूचना
उत्पादने
तुमच्या स्वप्नांची पूर्तता, एंटेल्कीने, "संपूर्ण कौशल्य आणि क्षमता विकास" साध्य करणाऱ्या त्यांच्या विविध उत्पादनांच्या माध्यमातून सुलभ केली आहे
उपक्रमांवर आधारित प्रणाली पेरिशिया©
पेरिशिया© ही एनईपी २०२०, आरटीई २००९, व युनेस्को ईएफए यांचे अनुपालन करणारी जगातील सर्वोत्कृष्ट ‘कौशल्य व् क्षमता’ विकास करणारी प्रणाली आहे
उत्थान, आपल्या आदिवासी बांधवांचे
मुख्य प्रवाहातील समाज आणि आपले आदिवासी बांधव यांच्यातील ‘कौशल्य आणि रोजगार’ अंतर कमी करण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणावर मात करणे
जीवन दिशा©
करिअरच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य वयात अंगीकृत कौशल्य आणि क्षमता ओळखून विश्लेषणात दर्शविलेल्या कमकुवत घटकांमध्ये सुधारणा करणे
स्वान - ऑनलाइन चाचणी
स्वान ऑनलाइन चांचणीच्या माध्यमातून अणि शिफारस केलेल्या ऍक्शन प्लॅन च्या सहाय्याने निवडलेल्या विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यशस्वीतेचे प्रमाण वाढविणे.
शाळा
विद्यार्थी
शिक्षक
करियर
मार्गदर्शन
आमच्या विषयी
‘एंटेल्की’ (Entelki) हा शब्द ‘entelechy’ या ग्रीक शब्दापासून तयार केलेला आहे. 'entelechy' चा अर्थ आहे 'क्षमतांची पूर्तता'. मानवी विकास, शिक्षण आणि बाल मानसशास्त्र यांसारख्या विविध क्षेत्रातील २० ते ३० वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या तज्ज्ञांचा समावेश असलेल्या टीम एंटेल्कीचा असा दृढ आणि प्रामाणिक विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये जन्मजात अशा प्रचंड क्षमता असतात. आयुष्यात यश मिळविण्याकरिता या क्षमतांचे प्रथम वैज्ञानिक विश्लेषण आणि शोध घेणे व त्यानंतर त्यांचा पद्धतशीरपणे विकास करणे आवश्यक असते.
उद्योग क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि शैक्षणिक तज्ज्ञ, समाजाच्या गरजा व आवश्यकता आणि एंटेल्की सिस्टमच्या क्षमता यांच्यात योग्य संतुलन राखण्यासाठी आम्हाला मौलिक सल्ला देतात.
Testimonials
उर्शीला गुळगुळे
विल्सन हायस्कूल, मुंबई
विल्सन हायस्कूलमध्ये लागू केलेल्या एंटेल्कीच्या प्रोग्राममुळे विद्यार्थ्यांना मूलभूत संकल्पना समजण्यास आणि त्यांची भाषा कौशल्ये, गणिताची कौशल्ये आणि तार्किक कौशल्ये सुधारण्यास मदत झाली. माहितीचा उलगडा करणे, परिस्थितीचे विश्लेषण करणे, कोडी सोडवणे यांसारख्या आव्हानात्मक उपक्रमांचा सर्व विद्यार्थ्यांनी आनंद लुटला.
राठोड सर
मुख्याध्यापक, ज़िल्हा परिषद शाळा, विंझर
एंटेल्कीचा उपक्रमांवर आधारित प्रोग्रॅम हा अतिशय उत्कृष्ट आहे ! या प्रोग्रॅममुळे आमच्या विद्यार्थ्यांची सर्जनशील विचार व आकलन शक्ती, तर्क कौशल्य आणि आत्मविश्वास सुधारण्यास मदत झाली. एनसीईआरटीने सुचविलेली शैक्षणिक निःष्पत्ती या कार्यक्रमाद्वारे साध्य होते. मी टीम एंटेल्की आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे त्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल अभिनंदन करतो.
श्रीमती संतोषा जोशी
शिक्षिका, आश्रम शाळा (आदिवासी), वाखरी
आमची भटक्या जमातींच्या मुलांसाठीची शाळा असल्याने, आमचा भर मूलभूत साक्षरता आणि गणितीय क्षमतेवर होता. एंटेल्कीचा कार्यक्रम म्हणजे आमच्यासाठी जणू कांही देवानेच दिलेला परिस्थितीवरील तोडगा असल्याचे सिद्ध झाले. मुले पुस्तके वाचू लागली, गणिताच्या मूलभूत संकल्पना समजून घेऊन शिकली, तसेच आरोग्य आणि स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करू लागली. सर्व विद्यार्थी हे उपक्रम आनंदाने करतात.
मृण्मयी पाटील
विद्यार्थीनी
एंटेल्कीची करिअर मार्गदर्शन चाचणी उत्कृष्ट अंतर्दृष्टी देते. ही चाचणी अत्यंत प्रभावीपणे अंतर्मनामध्ये परिणाम करते आणि सुधारण्याची क्षेत्रे दाखवून देते. या चाचणीचे 'तफावत विश्लेषण' हे वैशिष्ट्य सुस्पष्ट आणि वास्तववादी दृष्टीकोनातून यशस्वी होण्यासाठी करिअरचा निर्णय घेण्याच्या मार्गावर असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्ट साधन आहे.
परवीन शेख
पालक
एंटेल्कीची 'करिअर मार्गदर्शक' चाचणी एक अतिशय सुखद अनुभव होता. एक पालक म्हणून, आम्हांला या चाचणीचा निकाल, आमच्या मुलाच्या वागण्याशी तंतोतंत जुळल्याचा आढळून आला. ही चाचणी आमच्या मुलाच्या भविष्याबद्दल सुस्पष्ट मार्ग दाखविते. या चाचणीच्या अहवालामध्ये विस्तृत निकालासह दिलेली 'सुधारणा कृती योजना' ही अतिशय विलक्षण होती.