'स्वान' चाचणी
राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, एमबीए, अभियांत्रिकी इत्यादी स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या असंख्य करिअर इच्छुकांना, पुढील काही कारणांमुळे, ‘अनेक प्रयत्न अपयशी' होण्याच्या आव्हानाचा सामना करावा लागतो:
- स्वप्नासाठी / निवडलेल्या करिअरच्या योग्यतेचे मोजमाप: बहुतेक प्रकरणांमध्ये उमेदवाराला स्वतःच्या वर्तमान ताकद व कमकुवतपणाविषयी संपूर्ण ज्ञान नसण्यामुळे अनेक प्रयत्नांनंतरही यश मिळणे शक्य होत नाही.
- कमकुवत गुणवैशिष्ट्यांवर मात करण्यासाठी मार्गदर्शन: एखाद्याने स्वतःच्या वर्तमान ताकद व कमकुवतपणाविषयी संपूर्ण ज्ञान करून घेतल्यानंतरही, निदर्शनास आणून दिलेल्या त्यातील कमकुवत गुणवैशिष्ट्यांवर मात करण्यासाठी वैज्ञानिक व अस्सल मार्गदर्शन नसल्याने, उमेदवारास अपयश येऊ शकते आणि परिणामतः यश मिळण्यासाठी 'अनेक प्रयत्न' करावे लागू शकतात.
- अभ्यासाची पद्धत: बऱ्याचदा असे अनुभवास येते की उमेदवारांनी अवलंबिलेली अभ्यासाची पद्धतच चुकीची असते. परिणामी ते निरुपयोगी पुस्तके आणि साहित्य वाचून त्यांचा मौल्यवान वेळ वाया घालवितात. या अत्यंत महत्वाच्या घटकासंदर्भात योग्य मार्गदर्शन हे यश मिळण्याचा एक निश्चित घटक होऊ शकते.
वेगवेगळ्या करिअर्स साठी वेगवेगळी बनविलेली एन्टलकीची सामर्थ्य - कमकुवतपणाचे विश्लेषण, ‘स्वान’ चाचणी, उमेदवारांना वरील आव्हानांवर मात करण्यास अतिशय मोलाची मदत करते आणि हे सुनिश्चित करते की उमेदवाराची त्याच्या पसंतीच्या करिअर मध्ये यशस्वी होण्याची शक्यता वाढेल.
अधिक तपशीलांसाठी आमच्याशी संपर्क साधा आणि आम्ही आपल्या स्वप्नातील करिअरसाठी विशेषतः संकल्पित आणि विकसित केलेली "स्वान" चाचणी निवडण्यास आणि अंतिम करण्यात मदत करू!
वैशिष्ट्ये
चाचणीची व्यापकता
निवडलेल्या करियरसाठी आवश्यक ताकद व कमकुवतपणा यांचे वर्तमान विश्लेषण
चाचणी पद्धत
ऑनलाईन, बहुपर्यायी प्रश्नांची, भारित [वेटेड] स्कोअर पद्धतीची चाचणी
विश्लेषण अहवाल
‘प्रिंट’ आणि ‘सेव्ह’ पर्यायांसह ग्राफिकल विश्लेषण अहवाल ऑनलाईन उपलब्ध
सुधार योजना
कमकुवत गुणवैशिष्ट्यांचे सामर्थ्याच्या रुपांतर करण्यासाठी शिफारस कृतीयोजना
अभ्यासाची पद्धत
परिणामकारकता व यशाची शक्यता वाढविण्यासाठी करिअर विशिष्ट पद्धत सुचविली आहे